Corona Virus : करोना रुग्णांचे पाच दिवस घरीच विलगीकरण; टास्क फोर्सच्या सूचना

एमपीसी न्यूज – राज्यात करोना विषाणूच्या जे एन 1 व्हेरीयंटचे रुग्ण वाढत (Corona Virus)आहेत. वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता राज्यात पुन्हा एकदा टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

या टास्क फोर्सने करोनाची लागण झाल्यास घरातच पाच दिवस विलगीकरण करण्याचा सल्ला दिला आहे. याबाबत अद्याप नियमावली जाहीर झालेली नाही. मात्र लवकरच याबाबतची नियमावली जाहीर करण्यात येणार आहे.

कोविड 19च्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्ण संख्येवर (Corona Virus)नियंत्रण आणि उपायोजना करण्यासाठी 13 एप्रिल 2020 रोजी राज्यात टास्क फोर्स स्थापन करण्यात आले होते. राज्यात पुन्हा कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने या टास्क फोर्सची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

या टास्क फोर्समध्ये आयसीएमआर दिल्लीचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या कुलगुरू लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक, बी जे मेडिकल कॉलेज पुणे येथील डॉ. सुरेश कार्यकर्ते, नवले मेडिकल कॉलेज पुणे येथील डॉ. वर्ष पोतदार, नवले मेडिकल कॉलेज येथील फिजिशियन डॉ. डी बी कदम सदस्य आहेत. तर आयुक्त, आरोग्य सेवा सदस्य सचिव असणार आहेत.

Talegaon Dabhade : ‘तळेगाव दाभाडेत मालधक्का उभारा’

गंभीर व अतिगंभीर आजारी कोविड 19 रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रोटोकॉल स्थापन करणे, कोविड 19 क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर आणि आरोग्य सेवा सहायक कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेची शिफारस करणे, गंभीरपणे आजारी कोविड 19 रुग्णांवर उपचार करताना एकसमानता राखण्यासाठी रोग्य औषध प्रोटोकॉलची शिफारस करणे आदींबाबत टास्क फोर्स कार्यवाही करणार आहे.

कोविड टास्क फोर्सने घरातच पाच दिवस विलगीकरण करण्याची सूचना केली आहे. तसेच आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन आठवडे महत्वाचे असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यांमधील रुग्णालयांतील सुविधांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही टास्क फोर्सने सुचवले आहे.

पिंपरी-चिंचवड, पुणे शहरासह राज्यातील विविध भागात करोना रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी (दि. 3) अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 860 पेक्षा अधिक होती. तर जेएन 1 व्हेरीयंटची रुग्णसंख्या राज्यात 32 असून त्यातील 17 रुग्ण पुण्यात आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.