Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालयात भव्य कला – क्रीडा युवा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न

एमपीसी न्यूज -विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या हेतूने व त्यांच्या (Alandi)कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रमांचे / कार्यक्रमाचे व खो – खो, लांब उडी, डॉज बॉल, बुद्धिबळ, धावणे, 4×100 रिले इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

याच हेतूने श्री ज्ञानेश्वर विद्यालयात कार्यक्रमाचे अध्यक्ष ह. भ. प. योगी निरंजननाथ गुरुशांतीनाथ (विश्वस्त – श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी देवाची) यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा परिषद पुणेचे सदस्य बाबाजीशेठ काळे यांच्या शुभहस्ते भव्य – कला क्रीडा युवा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, (Alandi)श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, शिक्षकेतर प्रतिनिधी शिवाजी जाधव, क्रीडा व शिस्त समिती प्रमुख श्रीरंग शिक्षक पालक संघाच्या उपाध्या पवार, शिवकन्या मोरे, जयश्री गुंजाळ, सर्व शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

SSC HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये अडथळा; शिक्षण संस्था चालक आंदोलनाच्या पवित्र्यात

कार्यक्रमाची सुरुवात माऊली मंदिरातून प्रज्वलित क्रीडा ज्योत आणून व माऊलींच्या व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये दीपक मुंगसे यांनी खेळाचे महत्व सांगत खेळामुळे शरीर स्वास्थ्य व आरोग्य हे सुदृढ राहण्यास मदत होते, नेतृत्व गुण वाढीस लागतो असे सांगितले आणि विद्यार्थ्यांना आपल्या कला – गुणांतून देशाची आन बान व शान वाढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

यानंतर अजित वडगावकर यांनी आपल्या मनोगतातून कार्यक्रमाला व आयोजकांना शुभेच्छा दिल्या. बाबाजी काळे यांनी एवढी मोठी विद्यार्थी संख्या असलेली शाळा चालविणे खूप मोठं काम असल्याने संस्था चालकांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, आरोग्य व बुद्धिमत्ता असेल तर तो कधीही अयशस्वी होऊ शकत नसल्याचे सांगितले.

तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करत त्यांच्या कार्याला उजाळा दिला. शेवटी अध्यक्षीय भाषणामध्ये निरंजननाथ गुरुशांतीनाथ महाराज यांनी सर्व जीवनाचे गूढ हे ज्ञानेश्वरीत असल्याचे सांगितले. विद्यार्थी जीवनात गुरूचे महत्व, आई – वडिलांची सेवा याविषयी सांगून कला – क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न केला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने विज्ञान प्रकल्प व राष्ट्रभाषा हिंदी मध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे सन्मान करण्यात आले. तसेच पाहुण्यांच्या उपस्थितीत खो – खो, डॉज बॉल, लांब उडी सामन्याचे चलचित्र दाखविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश लिखे यांनी केले व उपस्थितांचे आभार श्रीरंग पवार यांनी व्यक्त केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.