Talegaon Dabhade : ‘तळेगाव दाभाडेत मालधक्का उभारा’

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानक परिसरातून (Talegaon Dabhade)औद्योगिक आणि शेती उत्पादने, देशात आणि परदेशात पाठवणे, सुलभ होण्यासाठी येथे मालधक्का आधुनिक तंत्रज्ञान वापरून उभारावा, अशी मागणी पिंपरी- चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सर्विसेस अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष तथा पुणे मध्य रेल्वे विभागीय सल्लागार समिती सदस्य अॅड. अप्पासाहेब शिंदे यांनी केली.

पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक दुबे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे मध्य रेल्वे विभागीय सल्लागार समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत त्यांनी ही मागणी केली. या बैठकीस पुणे रेल्वे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, डॉ. स्वप्नील नीला आदी उपस्थित होते.

Alandi : इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली; वारकऱ्यांसह आळंदीकरांच्या जीवाशी खेळ

पुणे लोणावळा रेल्वे मार्ग सहापदरी करण्याची मागणीही यावेळी (Talegaon Dabhade)करण्यात आली. तळेगाव स्टेशन येथे रेल्वेची मोठी गोदामे, शीतगृहे, औद्योगिक ट्रक टर्मिनल, कमर्शिअल सोयी आणि सेवा कार्यालये, रेल्वे बांधणार असल्याचे अधिकाऱ्यांनी समितीला सांगितल्याचे अॅड. शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.