Mahalunge : दुचाकीच्या चाकावरून लागला घरफोडी करणाऱ्या आरोपीचा शोध

एमपीसी न्यूज – महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी घरफोडी (Mahalunge)करणाऱ्या एका चोरट्याला अटक केली. त्याने 25 डिसेंबर रोजी मोई येथे 30 लाखांची घरफोडी केली होती. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत दुचाकीच्या चाकावरून आरोपीला अटक केली.

आमीर शब्बीर शेख (वय 25, रा. निगडी प्राधिकरण. मूळ रा. वडेश्वर काटे, वडगाव मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Chinchwad : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बातम्यांच्या वॉल पोस्टर्सचे चिंचवडमध्ये प्रदर्शन

पोलीस उपयुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 डिसेंबर रोजी (Mahalunge)सायंकाळी पाच ते रात्री पावणे दहा वाजताच्या कालावधीत मोई येथे घरफोडी झाली. याबाबत नितीन शहाजी कर्पे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चोरट्याने कर्पे यांच्या घराच्या पाठीमागील बाजूचे ग्रील कापून आत प्रवेश करत घरातून 47.8 तोळे सोने आणि पाच लाख 15 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 30 लाख 48 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

त्यानंतर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक दुचाकी संशयितपणे जाताना दिसली. त्या दुचाकीचे चाक लाल रंगाचे होते. त्यानंतर मोई, निघोजे, कुरुळी परिसरात गस्त घालताना पोलिसांना संशयित दुचाकी दिसली.

पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो दुचाकीसह पळून जाऊ लागला. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असतात याने कर्पे यांच्या घरी चोरी केल्याचे कबूल केले.

पोलिसांनी आमीर शेख याच्याकडून 47.8 तोळे सोन्याचे दागिने, तीन लाख रुपये रोख रक्कम आणि दुचाकी असा एकूण 29 लाख तीन हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी, पोलीस अंमलदार राहू कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, संतोष होळकर, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, किशोर सांगळे, शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, राहुल मिसाळ, अमोल माटे यांनी केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.