Bhosari News : शिवसेनेच्या रणरागिणींकडून कंगनाच्या प्रतिमेला जोडे

यावेळी संतप्त शिवसैनिकांनी कंगनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

एमपीसीन्यूज : शिवसेना शिरूर लोकसभा, भोसरी विधानसभा संघाच्या वतीने भोसरी येथे कंगना राणावतच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या रणरागिणींनी कंगनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, महिला संघटिका वेदश्री काळे, उपशहरप्रमुख अनिल सोमवंशी, समन्वयक राहुल भोसले, विधानसभा संघटक रावसाहेब थोरात, युवा सेना जिल्हा समन्वयक सचिन सानप, अमित शिंदे, माजी नगरसेविका सुरेखा बोरुडे, रुपाली आल्हाट, मनीषा परांडे, जनाबाई गोरे, दमयंती गायकवाड, आशा भालेकर, नयना पारखे, कल्पना शेटे, विश्वनाथ टेमगिरे, सतीश मरळ, नितीन बोन्डे, सहदेव चव्हाण, प्रवीण पाटील, श्रीदेवी लामजणे, विजया जाधव, नजमा शेख, स्मिता मोगरे, निर्मला पाटील, पुष्पा मुचुनडीकर, राजश्री पाटील, भारती चकवे यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

महाराष्ट्रात राहून मुंबईच्या जीवावर मोठी झालेलया महाराष्ट्र द्रोही कंगना हिने मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरशी केली. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी भोसरी येथे कंगनाच्या प्रतिमेला जोडे मारुन तीव्र निषेध नोंदवला. तसेच कंगनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.