Pimpri corona Update : शहरात आज 1005 नवीन रुग्णांची नोंद, 891 जणांना डिस्चार्ज, 24 मृत्यू

शहरात आजपर्यंत 53 हजार 289 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 42 हजार 349 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1005 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 53 हजार 289 वर पोहोचली आहे. शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 891 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 18 आणि पालिका हद्दीबाहेरील 6 अशा 24 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चिंचवड, भोसरी, गांधीनगर, रावेत, प्राधिकरण, यमुनानगर, वाकड, चिखली, रहाटणी, येरवडा, कोल्हापूर, मुळशी, बिबेवाडी, चाकण, दौंड येथील रुग्णांचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 53 हजार 289 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 42 हजार 349 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 909 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 208 अशा 1117 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 6110 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.