Bhosari : धावडे आळीत दोन घरफोड्या

एमपीसी न्यूज – भोसरी मधील धावडे आळी येथे (Bhosari)  अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 20) सकाळी आठ ते दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.

प्रतिक मारुती कराळे (वय 22, रा. धावडे आळी, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : इस्रो संशोधन संस्थेत डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर कुलूप लाऊन बंद असता आरोपीने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. शोकेस कपाटातून 45 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, 14 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली.

तसेच फिर्यादी यांच्या समोरील बाजूला राहणारे मच्छिंद्र कणसे यांच्या घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरातून सहा हजारांचा मोबाईल फोन चोरून नेला आहे. भोसरी पोलीस तपास करीत (Bhosari) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.