Bhosari: विलासराव म्हणाले, मी इच्छूक नाही, त्यांच्याकडून प्रेरणा घेत मी पण नाही; शरद पवारांची मिश्किल टिप्पणी

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभेला शक्यतो जास्तीत-जास्त नवीन लोकांना संधी दिली जाईल. विलासरावांना धन्यवाद देईल की, त्यांनी सांगितले मी विधानसभेला इच्छूक नाही. असे मी नाही सांगणारे हल्ली फार क्वचित लोक बघायला मिळतात. विलासरावांकडून मी प्रेरणा घेतली असून मीही इच्छूक नाही, अशी मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. याने सभागृह हास्यकल्लोळात बुडाले होते.

शरद पवार यांनी आज (गुरुवारी) विधानसभा निवणुकीच्या दृष्टीने शहरातील तीनही मतदारसंघाचा भोसरीत आढावा घेतला. यावेळी बोलताना माजी आमदार विलास लांडे म्हणाले, मी विधानसभा निवडणुकीला इच्छूक नाही. फक्त 2014 मध्ये जे केले ते करू नका. मला तिकडून तिकीट होते. पण, मी गेलो नाही. कारण माझी साहेबांवर निष्ठा आहे.

  • हाच धागा पकडत शरद पवार म्हणाले, विलासराव म्हणाले मी विधानसभेला इच्छूक नाही. असे मी नाही सांगणारे हल्ली फार क्वचित लोक बघायला मिळतात. विलासरावांकडून मी प्रेरणा घेतली असून मीही इच्छूक नाही, अशी टिप्पणी केली. त्यांच्या या मिश्लिकिल टिपणीने सभागृह हस्सकल्लोळात बुडाले.

नवीन लोकांना पुढे केल्यास लोक संधी देतात. त्यामुळे यावेळी विधानसभेला फ्रेश चेहरे देण्यात येतील. सगळे त्यासाठी काम करतील. मोठ्या नगरांमध्ये त्या-त्या ठिकाणी काम करणा-या नेत्यांमध्ये जनसामान्यांमध्ये भावना वेगळी असते. त्यांना लोकांना नवीन चेहरा हवा असतो. नवीन चेह-याला संधी द्यावी, असे त्यांची भावना असते, असेही शरद पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.