Pimpri: ….म्हणून लोकसभेला जनतेने भाजपला निवडून दिले – शरद पवार

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर शेजारचे राष्ट्र आक्रमण करत असल्याचे सत्ताधा-यांनी भासविले. असे उद्योग रोखण्यासाठी ठोस कार्यक्रमाची गरज असल्याचे सांगितले. हे केवळ आपणच करु शकतो. हे जनतेला सांगितले. त्याचा प्रचार केला. तसे वातावरण तयार केले. त्यामुळे याला आवर घालण्याची कुवत यांच्यामध्येच आहे. लोकांमध्ये प्रखर राष्ट्रप्रेमाची भावना वाढीला लागली आहे. त्या भावनेला साद देणारे व्यक्तीमत्व कोण आहे. हा प्रश्न मतदारांना पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव समोर आले. त्यामुळे जनतेने भाजपला निवडून दिल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. विधानसभेला जनता मोदी यांना बघून नव्हे तर आपल्यासाठी काम करणा-याला बघून मतदान करते, असेही ते म्हणाले.

भोसरीत बोलताना शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीने देशात निवडणूक लढविली नव्हती. काँग्रेसने लढविली होती. काँग्रेसचे नेतृत्व तरुण संसद सदस्य होता. तर, दुसरीकडे देशात मोदी-मोदी वातावरण तयार केले होते. त्यामुळे देशाची जबाबदारी घेणारी व्यक्ती कोणती? असा प्रश्न जनतेसनमोर आला.

  • तेव्हा मोदी यांचे नाव आले. त्याचा लाभ भाजपला झाला. ही लोकसभेची निवडणूक होती. लोकसभेत हे घडते. विधानसभेला ते घडत नाही. त्यामुळे खचून जाऊ नका. विधानसभेला मतदार वेगळा विचार करतात. विधानसभेला लोक मोदी यांना नाही. त्यांच्यासाठी प्रत्यक्षात कोण काम करतो. त्याचे जनमानसात स्थान काय आहे? हे नजरसमोर ठेऊन मतदान केले जाते, असेही शरद पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.