Bhosari: मैदानात बॉलर दिसताच दांडी गुल – डॉ. अमोल कोल्हे यांचा आढळरावांवर निशाणा

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीला शिरुर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून बॉलिंग कोण करणार तेच ठरले नाही. तोपर्यंत केवळ मैदानात बॉलर दिसयाला लागले. एवढ्यातच दांडी गुल झाली अन्‌ कुठल्या चौकार मारण्याच्या गप्पा करत आहेत, असा जोरदार निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यावर नाव न घेता साधला. तसेच देश परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. इजा-बिजा-तिज्या झाले. आता चौकार बिवक्कारा स्वप्नातच विरुन जाणार आहे. खासदारांच्या 15 वर्षाच्या निष्क्रिय कारकिर्दीचा आपल्या खास शैलीत डॉ. कोल्हे यांनी समाचार घेतला.

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज (मंगळवारी) भोसरीतील ”गावजत्रा मैदान” येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठनेते दिलीप वळसे पाटील, डॉ. अमोल कोल्हे, देवदत्त निकम, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, अतुल बेनके, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, अपर्णा डोके, वैशाली घोडेकर, मोहिनी लांडे आदी उपस्थित होते.

  • छत्रपती संभाजी महाराज यांच्या पोषाखातील फोटो फेलक्सवर लावू नका. मी जरी त्या भूमिका करत असलो तरी मी स्वत:ला महाराजांचा मावळा समजतो. त्यामुळे गेटपमधील फोटो जाहीरातीत वापरु नका. महाराज सार्वकालिक थोर आहेत. ते होते म्हणून आज आपण आपली ओळख सांगत आहोत. ती प्रतिमा मी देव्हा-यात ठेवत असेल तर ती प्रतिमा फेलक्सवर आणू नये, अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती करत कोल्हे पुढे म्हणाले, शिरुर मतदारसंघात ‘तो मी नव्हेच’ या वेगळ्या नाटकाचे प्रयोग सुरु आहेत.

मालिकेसाठी मी माझी स्वत:ची मालमत्ता विकली असती असे कुणीतरी सांगितले. असे कोण म्हणत असेल तर त्याचे आश्चर्य वाटते. इतक्या दिवस कोणी अडविले होते. हलगी वाजली आखडा सुरु झाला. पैलवान एकमेकांना भिडले कुस्ती काट्यावर आली. निकाली निगणार तितक्यात प्रेक्षकांमधून आरे… मी पण उतरणार होतो की. ‘मी यावं करीन… मी त्याव करीन’ असे सांगण-यांनी मालिका हे राजकारण नाही, हे लक्षात घ्यावे.

  • मालिका हा छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगार गाथेचा धगधगता यज्ञ आहे. त्याला हात घालण्याचा प्रयत्न करु नका हात पोळतील. छत्रपती संभाजी महाराजांची मालिका गम्मंत नाही. कोणीही उठावे आणि टिंगल करावी. दुरचित्रवाणीच्या इतिहासात एखदा सुद्धा कोणाची हिंमत झाली नाही. ती हिंमत केलेला माणूस तुमच्यासमोर उभा आहे. त्यामुळे त्या मालिकेवर बोलू नका. तो विषय वेगळा आहे, असेही डॉ. कोल्हे यांनी ठणकावले.

आपण बुजुर्ग, अनुभवी आहात. तुमचा मान ठेवला जाईल. याची नक्कीच ग्वाही देतो. पण, त्याचवेळी हेही लक्षात ठेवा. सोशल मीडियावर बोलके पोपट सोडलेत. त्यांचे गळे आत्तांच थांबवा. त्यांची बोलणी थांबवा नाहीतर एक गोष्ट लक्षात ठेवा. झोपलेल्या छाव्याला एक दगड, दुसरा दगड मारल्या छावा दुर्लक्ष करतो. तिसरा दगड मारला तर, छावा असा पंजा मारतो. झाकायचा कुठे आणि दाखवायचे काय ते सुद्धा कळत नाही. त्यामुळे तशी वेळ आणू नका, असे गर्भित इशारा देखील डॉ. कोल्हे यांनी दिला.

  • देश परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. इजा-बिजा-तिज्या झाले. चौकार बिवक्कारा आता स्वप्नातच विरुन जाणार आहे. केंद्रातील सरकार बदलणार आहे. मराठी माणूस देशाच्या उंच पदापर्यंत जाणार आहे. शरद पवार साहेबांचे रुपाने आपल्याला दिसणार आहे. त्यांचे हात बळकट करण्यासाठी शिरुरमधून राष्ट्रवादीचा उमेदवारच खासदार झाला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच मोदी सरकारवर देखील कोल्हे यांनी जोरदार हल्लाबोल केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.