Kalewadi : स्टाईल आयकॉन फॅशन शो पुणे 2019 उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- श्री प्रोडक्शन आयोजित स्टाईल आयकॉन पुणे 2019 हा फॅशन शो उत्साहात साजरा झाला. प्रथमच आयोजित केलेल्या या शोमध्ये भारतातील अनेक राज्यातुन मिस्टर, मिस अन मिसेस तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवर दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री मोठ्या संख्येने उपस्थित होते. 29 क्लब काळेवाडी इथं या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते.

स्टाईल आयकॉन पुणे 2019 स्पर्धेत अनुष्का पिंपुटकर या मिस, कविता मगरे या मिसेस तर केतन गायकवाड हे मिस्टर स्टाईल आयकॉन पुणे 2019 चे मानकरी ठरले. सिद्धी धनवडे, पिया कौसुमकर, अक्षय खिरिद प्रथम तर हिरल बिवोडी, रेश्मा दास, छानप्रितसिंग द्वतिय विजेते ठरले. प्रसाद सरकाळे, नुपूर काळे, नंदिनी आल्हाट, तेजस रायभर, रॉकी हंडाळ, योगिता जाधव, क्रांती नवले, वर्षा चौधरी, प्रियंका, अक्षता उकिर्डे विविध विभागात विजेते ठरले

या भव्य फँशन शोचे ट्वींन्कल पटणी, उद्योजक विशाल पाटील आणि प्रियंका मिसाळ यांनी सुंदर नियोजन केले होते. फॅशन शोसाठी परीक्षक म्हणून सुप्रिया ताम्हाणे, योगिता दारबस्तवार व करन नाथानी यांनी काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.