Bhosari : महिलेला मारहाण करणा-या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – तरुणीला चापट माराणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विनोद लक्ष्मण जाधव (वय 22, रा. भोसरी) याला अटक केली आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी सोमवारी (दि. 11) दुपारी तीनच्या सुमारास महाविद्यालयातून घरी येत असताना विनोद दुचाकीवरुन येवून त्याने तिला अडवले आणि ‘तू माझ्याशी का बोलत नाही?’ असे विचारले.

पीडितेने ‘मला तुला बोलायचे नाही’ असे सांगितले. यावर चिडून ‘तू मला कसे बोलत नाही हेच बघतो’ म्हणून तिला चापट लगावली. याप्रकरणी पीडितेने आईला सांगितले असता त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. भोसरी पोलीस याचा तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.