Bhosari : मुली झाल्या म्हणून विवाहीतेचा छळ; पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा

एमपीसी न्यूज – दोन मुली झाल्या म्हणून 24 वर्षीय विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात पती आणि सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित 24 वर्षीय महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार पती चंद्रकांत गायकवाड, सासरे व्यकंट गायकवाड, सासू शेषाबाई गायकवाड, दिर सुशांत गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मुली झाल्या म्हणून पिडीतेचा सतत अपमान पती आणि सासू, सासरे करत होते. तसेच माहेरून 50 हजार आणि 4 तोळे सोने घेऊन ये म्हणत तिचा मानसिक आणि शारिरीक छळ केला जात होता.

शिवीगाळ तसेच मारहाणीला कंटाळून पिडीतेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. भोसरी पोलीस याचा तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.