Vadgaon Maval : पवना जलवाहिनी करिता जमीन संपादनाचे शेरे काढा, भाजप किसान मोर्चाची मागणी

एमपीसीन्यूज – पवना बंदिस्त जलवाहिनी कायमस्वरूपी रद्द करून बाधित शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावरील संपादनाचे शेरे काढून टाकावेत, अशी मागणी भाजप किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संतोष दाभाडे, तालुकाध्यक्ष सुभाष धामणकर,गुलाब घारे, विकास शेलार, कचरू पारखी, राजाभाऊ असवले, बाळासाहेब पारखी यांनी नायब तहसीलदार प्रसन्न केदारी यांना निवेदन दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पवना बंद जलवाहिनी योजनेला विरोध करण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी 2011 मध्ये आंदोलन केले होते. अजूनही या योजनेला शेतकऱ्यांचा विरोध आहे. तसेच, बाधित शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर निगडी जलशुद्धीकरण केंद्र बंद पाइपलाइन करिता संपादित’ असा शेरा आजही आहे.

त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक काम करता येत नाही. यासाठी शासनस्तरावर संपादनाचे शेरे काढून टाकणे आवश्यक असून, याबाबत योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.