India Corona Update : तीन कोटी 10 लाख रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 97.36 टक्के

एमपीसी न्यूज – भारतात गेल्या 24 तासांत 44 हजार 643 नव्या रुग्णांची वाढ झाली असून, गेल्या 24 तासांत 41 हजार 096 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 3 कोटी 10 लाख 15 हजार 844 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 97.36 टक्के एवढा झाला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 18 लाख 56 हजार 757 एवढी झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, सध्या 4 लाख 14 हजार 159 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

भारतात आजवर 4 लाख 26 हजार 754 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 464 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.34 टक्के एवढा आहे.

देशात आजवर 47 कोटी 65 लाख 33 हजार 650 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 14 लाख 40 हजार 287 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

49.53 कोटी लोकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 48 कोटी 53 लाख 27 हजार 595 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात जवळपास 58 लाख नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.