BJP : भाजपच्या `सेल्फी विथ लाभार्थी` मोहिमेला उद्यापासून सुरुवात

एमपीसी न्यूज : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि चौदा महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज झाली आहे. (BJP) भाजपच्या वतीने दिल्ली ते गल्ली विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यानूसार केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ ज्या नागरिकांनी घेतला आहे, त्यांच्यासोबत सेल्फी आणि संवाद कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जात आहे.

सेल्फी विथ लाभार्थी या मोहिमेची सुरूवात उद्या (ता.27) पासून छत्रपती संभाजीनगरातून होत आहे. पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविले जात आहे. उद्या (सोमवारी) शहरातील तापडिया नाट्यमंदिरात दुपारी 1 वाजता या कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे.

Talegaon Dabhade : परांजपे विद्या मंदिरात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, पंकजा मुंडे यांची देखील यावेळी उपस्थिती राहणार आहे. (BJP) याशिवाय राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्यास जिल्ह्यातील भाजपचे नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारकडून देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहचल्या का? हे देखील सेल्फी विथ लाभार्थी या उपक्रमातून जाणून घेण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.