Chinchwad Bye-Election :  चिंचवडमध्ये 5 वाजेपर्यंत 41 टक्के मतदान, मतदानासाठी अवघा अर्धा तास शिल्लक

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज (रविवारी) सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया पार पडत आहे. (Chinchwad Bye-Election) मतदानासाठी अवघा अर्धा तास उरला असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत 41.06 टक्के मतदान झाले आहे.

BJP : भाजपच्या `सेल्फी विथ लाभार्थी` मोहिमेला उद्यापासून सुरुवात

पहिल्या दोन तासात सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 3.52 टक्के मतदान झाले होते. 11 वाजेपर्यंत 10.45 टक्के मतदान झाले आहे. तर, दुपारी 1 वाजेपर्यंत 20.68  टक्के मतदान झाले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत 30.55 टक्के मतदान झाले होते. सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत (Chinchwad Bye-Election) 5 लाख 68 हजार 954 मतदारांपैकी 1 लाख 29 हजार 888 पुरुष तर 1 लाख 37 हजार 28 महिला अशा 2 लाख 33 हजार 620 लोकांनी मतदान केले. एकूण 41.06 टक्के मतदान झाले आहे. आता मतदानासाठी अवघा अर्धा तास उरला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.