Talegaon Dabhade : परांजपे विद्या मंदिरात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या ॲड पु वा परांजपे विद्या मंदिर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ (Talegaon Dabhade) शुक्रवारी (दि. 24) संपन्न झाला. शिक्षकांची प्रेरणा, देशभक्तीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारी ओळखून प्रगती करण्याचा सल्ला देण्यात आला.

याप्रसंगी महिन्द्रा ॲन्ड महिन्द्रा कंपनीचे जनरल मॅनेजर दीपक बासुतकर, वर्षा बासुतकर, माजी नगरसेवक संतोष दाभाडे, आनंद दादा भेगडे, पुणे जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष अशोक काळोखे, आदर्श विद्या मंदिरचे माजी मुख्याध्यापक प्रकाश शिंदे, शालेय समिती अध्यक्ष नंदकुमार शेलार, विजयकुमार इनामदार, विजया इनामदार, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्रा सत्यजित खांडगे, पत्रकार प्रभाकर तुमकर, शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या भाषणामधून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मौलिक असे मार्गदर्शन केले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

दीपक बासुतकर म्हणाले की विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच आपल्यातील कौशल्य ओळखणे गरजेचे आहे.त्यानुसार पुढील ध्येय ठरवून मार्गक्रमण करावे. (Talegaon Dabhade) संतोष दाभाडे यांनी निर्मल वारीबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राष्ट्रभक्तीच्या जोरावर राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्याचा सल्ला दिला.

Talegaon Dabhade :  मावळात मंदिरांच्या संवर्धनासाठी कोणतीच व्यवस्था दिसत नाही – ओंकार वर्तले

यावेळी बोलताना प्रा सत्यजित खांडगे म्हणाले की, कोणत्याही दडपणाला बळी न पडता मोकळया वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे. शाळेतून बाहेर पडल्यावरही शाळेची बांधिलकी न तोडता पुढील पिढ्यांना शाळेत चांगले शिक्षण मिळावे म्हणून योगदान द्यावे.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात आदर्श विद्या मंदिराचे माजी मुख्याध्यापक प्रकाश शिंदे म्हणाले की, आपल्या अभ्यासाची जबाबदारी ही आपलीच असते. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून गुण संपादन करावे व पुढील आयुष्यात आपले आईवडील व शिक्षकांनी केलेल्या संस्काराला कलंक लागणार नाही याची खबरदारी घ्यावी.

याप्रसंगी काही विद्यार्थी व शिक्षक यांनी आपल्या भावना मनोगताच्या रूपात व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गा भेगडे, इयत्ता नववी मधील विद्यार्थिनी गायत्री ठोसर, (Talegaon Dabhade)  वेदांती पाटील यांनी केले. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव,शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार शेलार यांनी विद्यार्थ्यांच्या यशप्राप्तीसाठी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.