Chinchwad News : कुटुंबातील 92 वर्षाच्या आजी अन 18 वर्षाची नात यांनी एकाच वेळी बजावला मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज (शर्मिला पवार) –  मतदाराला मतदार राजा म्हणतात, कारण मतदाराचा जो कौल असेल तो उमेदवाराला स्विकारावा लागतो. मतदार कोण सत्तेवर बसणार कोण पाय उतार होणार हे ठरवत असतो. आपल्या एका मताचे एवढे मूल्य असताना देखील बरेच जण मतदानापासून दूर राहतात.(Chinchwad News) मात्र चिंचवड मध्ये बारसावडे कुटुंबीय दरवर्षी आपली जबाबदारी सहकुटुंब-सह परिवार निभावत आहेत म्हणायला हरकत नाही. कारण 92 वर्षीय आज्जीपासून ते 18 वर्षीय नात अशा आठ जणांनी आज (रविवारी) मतदानाचा हक्क बजावला आहे.

या बारसावडे कुटुंबात आज मागील 70 ते 74 वर्षापासून मतदान करणाऱ्या वत्सला बारसावडे या अनुभवी मतदार तर 18 वर्षाची नवीन विचाराची नवीन ध्येय असणारी पुर्वा यांनी एकाच वेळी मतदान केले. वत्सला आजी या मागील 20 वर्षापासून चिंचवड मतदार संघात मतदान करत आहेत. त्या आधी त्या पंढरपुर येथे मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांचे पती स्वातंत्र्यसैनिक होते त्यांनी अगदी इंदिरा गांधी यांच्याशी हस्तांदोलन केल्याची आठवण ही त्यांनी यावेळी सांगितली.

Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे स्कूलमध्ये पालकांसाठी समुपदेशन कार्यशाळा

मतादानाविषयी बोलताना आजी म्हणाल्या की, त्यांनी त्यांच पहिल मत हे इंदिरा सरकार यांना केले होते. ज्या उमेदवाराचे चिन्ह हे नांगरधारी शेतकरी होते. तेंव्हा पासून ते आजतागायत त्यांनी कधीच मतदानात खंड पाडला नाही त्यामुळेच आम्हालाही प्रेरणा मिळाली असे बारसावडे कुटुंबीय आवर्जून सांगतात. याच संस्कारातून वत्सला यांचा मुलगा दत्तात्रय बारसावडे यांची नुकतीच मेंदूची शस्त्रक्रिया झाली असतानाही त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

आपल्या कुटुंबाच्या या परंपरे बद्दल बोलताना पुर्वा म्हणाली की, आजी, बाबा, काका यांना मी नेहमीच मतदान करताना पाहिले आहे. सुट्टी असले तरी पहिल्यांदा मतदान असे प्राधान्य असायचे. त्यामुळे मी कधी मतदान करतेय अशी उत्सुकता मला कायम होती. (Chinchwad News) आज ती इच्छा पण पुर्ण झाली. मात्र मतदान केवळ बटण दाबणे नसते तर आपल्या भागातील उमेदवाराचे काम पाहून मोठ्या जबाबदारीने त्याला मत देणे हे महत्त्वाचे कर्तव्य असते हे मला आज जाणवले. त्यामुळे युवकांनी आपले अमुल्य मत वाया न घालवता मतदान करावे, असा सल्लाही पुर्वाने मतदारांना दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.