Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे स्कूलमध्ये पालकांसाठी समुपदेशन कार्यशाळा

एमपीसी न्यूज – तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित, (Talegaon Dabhade) कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शनिवारी (दि. 25) नर्सरी ते इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी समुपदेशन कार्यशाळा घेण्यात आली.

या समुपदेशन कार्यशाळेत मुख्य समुपदेशक म्हणून सतीश पाटील यांना बोलवण्यात आले होते. त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, संस्थेच्या खजिनदार गौरी काकडे व शाळेच्या सर्व पर्यवेक्षिका उपस्थित होत्या. तसेच इयत्ता नर्सरी ते दहावीचे पालकही उपस्थित होते.

Talegaon Dabhade :  मावळात मंदिरांच्या संवर्धनासाठी कोणतीच व्यवस्था दिसत नाही – ओंकार वर्तले

कार्यक्रमातआलेल्या पाहुण्यांचे प्रथमतः शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यांनी आपल्या समुपदेशनात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षकांबरोबरच पालकांचा सहभाग किती महत्त्वाचा असतो याविषयी चर्चा केली. शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या समन्वयानेच भविष्यातील (Talegaon Dabhade) सुजान नागरिक घडणार आहेत याची त्यांनी शाश्वती दिली. या कार्यशाळेत शाळेच्या पर्यवेक्षिका कीर्ती कुलकर्णी, ज्योती सावंत यांनी सूत्रसंचालन केले. रमा बागुल यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.