Lockdown Diary: नोकरी सांभाळून कलागुण जोपासणारे चित्रकार सिद्धेश जोशी

Blog By Amar Manerikar, Lockdown Diary: Siddhesh Joshi, a painter who cultivates art in his spare time लॉकडाऊनच्या काळात सिद्धेश जोशी यांनी आपल्या कलागुणांना मनसोक्त वेळ देत पेंटींग/चित्रकलेचा आनंद घेतला.

एमपीसी न्यूज – लाॅकडाऊन हा शब्द आपण सर्वांनीच पहिल्यांदा ऐकला असावा आणि ते काय आहे व ते कसं असतं हे कोणालाच माहित नव्हतं. लाॅकडाऊन इतक्या मोठ्या प्रमाणात वाढेल अशीही कोणाला अपेक्षा नव्हती. जसा लाॅकडाऊन वाढत गेला तसा लोकांना प्रश्न पडू लागला की अस घरी राहून आपण काय करू शकतो? लॉकडाऊन काळात कोणी काय-काय केलं…. काय नवीन उपक्रम राबविले, काय कलाविष्कार घडविले, लॉकडाऊनचे कोणावर काय परिणाम झाले. याच्या बारीक नोंदी केल्या आहेत, पिंपरी-चिंचवडमधील अमर मणेरीकर यांनी त्यांच्या लॉकडाऊन डायरीमध्ये… त्यांच्या डायरीचे एक-एक पान या मालिकेमध्ये ते उलगडणार आहेत.  

 

नोकरी सांभाळून कलागुण जोपासणारे चित्रकार सिद्धेश जोशी

लॉकडाऊन डायरी/ अमर मणेरीकर

काहींनी स्वयंपाकाचा छंद जोपासला तर काहींनी टाकाऊ पासून टिकाऊ आकर्षक वस्तू बनवण्याचा प्रयत्न केला. चिंचवड येथील असेच एक कलाकार सिद्धेश दत्तात्रय जोशी (चिंचवड). सिद्धेश हे एका नामांकित कंपनीत व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळतात. ही जबाबदारी सांभाळून फावल्या वेळेत ते त्यांच्या कलागुणांचीही जोपासनाही करतात.

लॉकडाऊनच्या काळात त्यांनी आपल्याला कलागुणांना मनसोक्त वेळ देत पेंटींग/चित्रकलेचा आनंद घेतला. त्यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या काही कलाकृतींचा सुंदर व्हिडिओ देखील त्यांनी तयार केला आहे. एमपीसी न्यूजच्या दर्शकांसाठी सादर करीत आहोत, सिद्धेश जोशी यांच्या कलाविष्काराची झलक दाखविणारा हा व्हिडिओ…

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.