Bye Election : पोटनिवडणुकीसाठी मतदानापूर्वी तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीस बंदी

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील  चिंचवड आणि कसबा पेठ  विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून  मतदानाच्या दिवशी 26 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी  मतदान प्रक्रिया संपेपर्यंत आणि मतमोजणीच्या 2 मार्च 2023 रोजी मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत संपूर्ण मतदार संघ क्षेत्रातील सर्व किरकोळ मद्यविक्री बदं (Bye Election) ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.

Mp Shrirang Barne : श्रीरंगआप्पा बारणे सोशल फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर

पुणे जिल्ह्यातील   चिंचवड’ आणि  कसबा पेठ  विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ही निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी निर्देशित कालावधीत व मतदार संघात सर्व किरकोळ मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या कालावधीत निवडणूक निर्वाचण कार्यक्षेत्रातील सर्व देशी, विदेशी, बिअर, वाईन निर्माणी अनुज्ञप्तीधारक बंदच्या कालावधीत उत्पादन करु शकतील. परंतु या कालावधीत कोरडा दिवस लागू असलेल्या क्षेत्रातील अनुज्ञप्तीधारकांना देशी, विदेशी मद्याचा पुरवठा करता येणार नाही. या बंद कालावधीत मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांची अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यासह संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.