Pune News : विद्यापीठ चौक वाहतूक बदलातील उणीवा दूर करू – सिद्धार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज  – विद्यापीठ चौकातील नवीन वाहतूक पॅटर्न मधील काही उणीवा आढळल्यास त्या वाहन चालक आणि रहिवासी यांच्याकडून माहिती घेऊन दूर केल्या जातील, (Pune News) असे आश्वासन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (सोमवारी) दिले.

पोलीस उपआयुक्त (वाहतूक) विजयकुमार मगर व पुणे शहर वाहतूक शाखेचे अधिकारी यांच्यासमवेत आमदार शिरोळे यांनी पुणे विद्यापीठ रस्त्याच्या नवीन वाहतूक पॅटर्नची पाहणी केली. नवीन पॅटर्नमध्ये काही उणीवा असल्या तरी, वाहन चालक आणि रहिवाशांकडून याबाबत माहिती घेऊन त्या दूर केल्या जाऊ शकतील, असे आमदार शिरोळे यांनी पाहणीनंतर सांगितले.

Mp Shrirang Barne : श्रीरंगआप्पा बारणे सोशल फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर

उड्डाणपुलाच्या आगामी बांधकाम टप्प्यामुळे होणारी गैरसोय आणि (Pune News) गर्दीच्या वेळी होणारी कोंडी कमी करण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलीस प्रयत्नशील आहेत, असाही विश्वास आमदार शिरोळे यांनी व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.