Chinchwad News : राष्ट्रवादी चिंचवडची पोटनिवडणूक लढविणार का? अजित पवार म्हणाले…

एमपीसी न्यूज – चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Chinchwad News) यांचे निधन झाल्याने त्याजागी पोटनिवडणूक होणार असून पोटनिवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. जगताप यांच्या पत्नी अश्विनी की बंधू शंकर जगताप दोघापैंकी कोण निवडणूक लढेल, निवडणूक बिनविरोध होईल की राष्ट्रवादी निवडणूक लढवेल याची चर्चा सुरु झाली असताना याबाबत राष्ट्रवादीचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, निवडणूक लढविण्याबाबत त्या-त्या वेळची परिस्थिती बघून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ.

विरोधी पक्षनेते पवार आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवडच्या दौ-यावर होते. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक निवडणूक आयोग लावेल. त्यामुळे निवडणूक लढविण्याबाबत अद्याप महाविकास आघाडीची भूमिका ठरली नाही. 2019 च्या निवडणुकीत चिंचवडची जागा आम्ही पुरस्कृत केली होती. कसब्याची जागा काँग्रेसने लढविली होती.

Talegaon Dabhade : जिजाऊंचे संस्कार, विवेकानंदांचे तत्त्वज्ञान पुढील पिढीसाठी आवश्यक – प्रा. डॉ. संभाजी मलघे

त्यानंतरच्या काळात ब-याच प्रकारची राजकीय स्थित्यंत्तरे झाली असल्यामुळे त्यासंदर्भात (Chinchwad News) शेवटी आम्ही सर्व सहका-यांशी चर्चा करु आणि त्याबाबतचा अंतिम निर्णय घेवू. आताच लगेच, निवडणूक लागली नसताना चर्चा करण्यात अर्थ नाही असे माझे स्वत:चे मत आहे. मुंबईतील पोटनिवडणुकीत वेगळे आणि पंढरपुर, नांदेडच्या पोटनिवडणुकीत वेगळे चित्र पहायला मिळाले होते. त्यामुळे त्या-त्या वेळची परिस्थिती बघून निवडणूक लढविण्याबाबत आम्ही योग्य तो निर्णय घेऊ, असे पवार यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.