Talegaon Dabhade : जिजाऊंचे संस्कार, विवेकानंदांचे तत्त्वज्ञान पुढील पिढीसाठी आवश्यक – प्रा. डॉ. संभाजी मलघे

एमपीसी न्यूज – स्वराज्य जननी जिजाऊ माँ साहेब यांनी (Talegaon Dabhade) छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले संस्कार आणि स्वामी विवेकानंद यांनी जगाला दिलेले भारतीय तत्वज्ञानाचे सार महत्वपूर्ण आहे. या दोन गोष्टी मनापासून आत्मसात केल्या तर समाज आणि पुढच्या अनेक पिढ्या वैचारिक दृष्ट्या बलवान होतील असे इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे म्हणाले. इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या प्रसंगी प्राचार्य डॉ संभाजी मलघे, डाॅ.प्रमोद बोराडे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा.दीप्ती पेठे, प्रा. ज्ञानेश्वर काकडे, प्रा. मिलिंद खांदवे आदी मान्यवर उपस्थित होते.

डाॅ. मलघे म्हणाले इंद्रायणी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि सांस्कृतिक समितीने (Talegaon Dabhade) अशा प्रकारे उपक्रम राबविण्याचा बेंच मार्क सेट केला आहे. ही अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांना त्यातून केवळ आनंदच नाही तर खूप काही शिकताही येईल हाच दृष्टीकोन समोर ठेवून राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक समितीने संयुक्तपणे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती आयोजित केली असल्याचे वक्त्यव्य प्राचार्य मलघे यांनी केले. स्वराज्य जननी जिजाऊ माँ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले संस्कार आणि स्वामी विवेकानंद यांनी जगाला दिलेले भारतीय तत्वज्ञानाचे सार या दोन गोष्टी मनापासून आत्मसात केल्या तर समाज आणि पुढच्या अनेक पिढ्या वैचारिक दृष्ट्या बलवान होतील असेही प्राचार्य मलघे म्हणाले.

Pune Winter : पुण्याचे आजचे तापमान 9 अंशावर; आणखी आठ दिवस गारठा कायम राहण्याची शक्यता

जिजाऊ केवळ शिवबांसाठीच नाही तर संपूर्ण मराठा साम्राज्यासाठी आणि आपल्या देशासाठी प्रेरणास्थान होत्या. जिजाऊंनी शास्त्रात सांगितल्याप्रमाणेच मुलगी, बहीण, पत्नी, सून, वहिनी, आई, सासू,आजी अशा सर्व भूमिका साकारल्या. त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य त्यांना प्रिय आणि आदर देत होते. कुटुंबात एक आधार म्हणून त्यांच्या कडे पाहिले जात होते. सर्व बाबतीत त्या एक आदर्श हिंदू स्त्री होत्या. राजमाता जिजाऊंच्या रूपाने आपल्यासमोर आदर्श ठेवल्याबद्दल संपूर्ण हिंदू समाज ईश्वराचे ऋणी आहे.असेही प्राचार्य मलघे यांनी आपल्या भाषणात सांगितले

डॉ.प्रमोद बोराडे यांनी प्रास्ताविकात स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याविषयी सांगितले, तसेच माता राजमाता जिजाऊ यांच्याविषयीही सांगितले. स्वतंत्र हिंदू राष्ट्राचा पाया त्यांनीच निर्माण केला आणि त्यांच्या शिकवणीने त्यांचे पुत्र शिवाजी महाराज यांच्याकडे ते हस्तांतरित केले ज्याने हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार झाले.

यावेळी बोलताना प्रा.मिलिंद खांदवे यांनी स्वामी विवेकानंद यांचे शिकागो येथील अनुभव आणि ज्ञान यामुळे ते जगप्रसिद्ध कसे झाले याबद्दल सांगितले. स्वामीजींनी भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारसा, द्वैतविरहीत नि:स्वार्थी प्रेम आणि राष्ट्रसेवा या संदेशांना ज्ञानाचा सागर म्हणून ओळखले जाते, असेही त्यांनी नमूद केले. सर्वोच्च सद्गुणांनी युक्त त्यांचे मंत्रमुग्ध व्यक्तिमत्व तरुणांच्या मनावर प्रकाश टाकते. त्यांच्या शिकवणीने त्यांच्यातील आत्म्याच्या शक्तीची जाणीव जागृत केली. असे खांदवे म्हणाले. प्रा.दिप्ती पेठे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रा. डी.पी. काकडे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.