Pune MPSC : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीत आज तरी निघणार का तोडगा?

एमपीसी न्यूज : 18 तासानंतर एमपीएससीची (Pune MPSC) करणाऱ्या विद्यार्थ्यानी काल आंदोलन मागे घेतले खरे; परंतु, आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या भेटीत विद्यार्थ्यांचे समाधान होणार का? हा आजचा महत्त्वाचा विषय आहे.

हिवाळी अधिवेशनादरम्यान एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. कोरोना महामारीनंतर दोन वर्षानी एमपीएससीची परिक्षा होत आहे. परंतु, त्यासाठी बदललेला अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांच्या परीक्षेत मोठा अडथळा ठरला आहे. हा अभ्यासक्रम 2025 रोजी बदलावा अशी मागणी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची आहे. हिवाळी अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला होता. परंतु, त्यावर सकारात्मक पावले उचलली गेली नाहीत; त्यामुळे पुन्हा काल विद्यार्थी रस्त्यावर उतरले. यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज विद्यार्थ्यांना भेटणार असल्याचे आश्वासन मिळाल्यावर 18 तासांनंतर विद्यार्थ्यानी मोर्चा स्थगित केला परंतु, हा पूर्णविराम नसल्याचे त्यांनी म्हंटले.

आज मिळणार का तोडगा? – Pune MPSC 

आज पाच विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पुण्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे हे आंदोलक विद्यार्थी आज  त्यांना भेटणार आहेत. त्यामुळं यावर आज काही तोडगा निघणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पुण्यात कडाक्याच्या थंडीत सुमारे 700 विद्यार्थी आंदोलन करत होते. त्यामुळे आता प्रशासनालाही दखल घ्यावी लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.