Pune : एमपीएससी विद्यार्थ्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; पुणे कार्यालयात जल्लोष

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेल्या (Pune) निर्णयाचे स्वागत करत एमपीएससी परीक्षार्थी उमेदवारांनी पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवसेना कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच शासनाने घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे आभार मानले.

राज्य शासन कायमच एमपीएससी परीक्षार्थींच्या सोबत होते. तसेच त्यांच्या मागणीनुसार नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याची विनंती आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला केली होती. ही मागणी मान्य करत आयोगाने आपली भूमिका  जाहीर केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Maharashtra : राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील 12 कलावंतांना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

विद्यार्थ्यांनी मानलेल्या आभाराचा याप्रसंगी विनम्रपणे स्वीकार करून (Pune) सरकार कायम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी म्हंटले.

यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, एमपीएससी विद्यार्थ्यांची बाजू लावून धरणारे आमदार गोपीचंद पडळकर आणि एमपीएससीची परीक्षा देणारे राज्यातील असंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.