Chakan : चाकण येथे कंपनीत दरोडा टाकणारे गजाआड, सिक्युरिटी गार्डनेच चोरी केल्याचे उघड

एमपीसी न्यूज – चाकण येथील टेक्नोड्राय सिस्टम इंजिनिअरींग प्रा.लि. या (Chakan) कंपनीत 17 फेब्रुवारी रोजी दरोडा टाकला होता. याचा चाकण पोलिसांनी छडा लावला असून पाच जणांना अटक केली असून सव्वा तीन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. हि चोरी सेक्युरोटी गार्ड याने त्याच्या साथीदरांसह केल्याचे पोलीस तपासा उघड झाले आहे.

दिलनवाज मोहमंद शफी खान (वय 54, रा.चाकण), मोहम्मद हनिफ मोहम्मद शफी शेख (वय 32), रिझवान अहमद अबुसामा चौधरी (वय 22), जसरुद्दीन वसीउद्दीन चौधरी (वय 23), दिपक युवरा सुरवाडे (वय 23) रा. मुंब्रा ठाणे अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकऱणीँ 17 फेब्रुवारी रोजी गोरक्षनाथ गोविंद गायकवाड (वय 36 रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथील टेक्नोड्राय सिस्टम इंजिनिअरींग प्रा.लि. या कंपनीत आरोपींनी सेक्युरीटी गार्ड दिलनवाज मोहम्मद खान याला धमकी देऊन तसेच चाकूचा धाक दाखवून तसेच नामदेव मरिबा भोगे यालाही लोखंडी रॉडने मारहाण करून दोरीने त्यांचे हातपाय बांधून कंपनीत प्रवेश केला. त्यांनी कंपनीतील 91 हजार 300 रुपयांचे 800 किलो स्टेनलेस स्टील टेम्पो मध्ये टाकून चोरून नेले होते., असे फिर्यादीत सांगितले होते.

 

पोलिसांच्या तपासी पथकाने कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच सेक्युरीटी गार्ड दिलनवाज खान याच्याकडे तपास केला असता त्याच्या बोलण्यात तफावत जाणवत होती. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने व त्याचे साथीदार अन्वर अली, मोहम्मद अली, मोहम्मद हनिफ मोहम्मद शफी खान, रिझवान अहमद अबुसामा चौधरी, जसरुद्दीन वसीउद्दीन चौधरी, दिपक युवरा सुरवाडे यांच्या साथीने चोरी (Chakan) केल्याचे कबूल केले.

Pune : एमपीएससी विद्यार्थ्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; पुणे कार्यालयात जल्लोष

पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेले 800 किलो वजनाचे स्टेनलेस स्टील व चोरीसाठी वापरलेला छोटा हत्ती टेम्पो (एमएच 03 सी.व्ही. 4326) मोबाईल असा एकू 3 लाख 36 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड करत आहेत.

हि कारवाई चाकण पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक वैभव भिंगारे, पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल देवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, विक्रम गायकवाड, सुरेश ङिंगे, पोलीस हवालदार राजू जाधव, संदिप सोनावणे, पोलीस नाईक हनुमंत कांबळे, निखील शेटे, भैरोबा यादव, महिला पोलीस नाईक भाग्यश्री जमदाडे, पोलीस शिपाई नितीन गुंजाळ, निखिल वर्पे, अशोक दिवटे, प्रदीप सळे, सुनील भागवत, चेतन गायकर यांनी केली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.