Pune Station : पुण्यात दहशतवादी हल्ला होण्याचा कॉल खोटा; भांडणाच्या रागात तरुणाचे कारस्थान

एमपीसी न्यूज : हल्ली कोणीही कुठलाही (Pune Station) राग मनात धरून काय करू शकेल याचा अंदाज बांधता येत नाही. असाच एक प्रकार पुण्यात घडला. प्रवाशासोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका प्रवाशाने थेट लोहमार्ग पोलिस स्टेशनला फोन करून बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती दिली. सविस्तर तपास केला असता, केवळ भांडणामुळे हा प्रकार घडला असल्याचे समोर आले. या प्रकरणी गोविंद भगवान मांडे (वय 38 वर्ष, रा. शिवशंभू नगर गल्ली क्रमांक एक कात्रज, मूळ गाव पिपळेगाव, परभणी) याला अटक करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी, की 14 जानेवारी रोजी सव्वाबारा वाजता जीआरपी कंट्रोल क्रमांकावर 9579337589 वरून एक कॉल आला. यामध्ये एका इसमाने मळवली स्टेशन दरम्यान बॉम्बस्फोट घडून येईल आणि पुणे रेल्वे स्टेशनवर 8 वाजता दहशतवादी हल्ला करण्यात येईल, अशी धक्कादायक माहिती (Pune Station) दिली. या माहितीनुसार संपूर्ण पोलिस फोर्स कामाला लागली. लोहमार्ग पोलीस, जीआरपीएफ व स्थानिक पोलीस श्वान पथकाच्या मदतीने पुणे रेल्वे स्टेशन येथे कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले.

Pune Winter : पुण्याचे आजचे तापमान 9 अंशावर; आणखी आठ दिवस गारठा कायम राहण्याची शक्यता

या तपासणी दरम्यान आलेल्या फोन नंबरचा तपास केला असता, पोलिस गोविंद मांडे पर्यंत पोहचली. आणि त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने गाडी मनमाड स्टेशन येथे जास्त वेळ थांबली होती. त्यावेळी बोगीमध्ये एका पॅसेंजरसोबत वाद झाल्याने रागाच्या भरात हा प्रकार केल्याचे त्याने कबूल केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.