Pune Winter : पुण्याचे आजचे तापमान 9 अंशावर; आणखी आठ दिवस गारठा कायम राहण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – पुण्याचे तापमान मागील आठ दिवसांपासून (Pune Winter) दहा अंशाच्या आखील असल्याने पुणेकर मागील आठ दिवसांपासून कडाक्याच्या थंडीचा सामना करत आहेत. आज देखील किमान तापमान हे 9.9 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस वर आहे. त्यामुळे सकाळी गारठा धुक्याची दाट चादर नागरिकांना अनुभवायला मिळाली आहे. पुढील आट दिवस पारा 9 ते 12 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पुणे शहर व आसपासच्या तापमानाचा विचार करायचा झाला तर सर्वाधीक कमी तापमान हे पाषाण येथे असून किमान तापमान 9.7 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान हे 30.4 अंश सेल्सिअस आहे. शिवाजीनगर येथे किमान तापमान 9.9 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32.4 अंश सेल्सिअस आहे. तोच पारा हडपसर येथे 13.3 अंश सेल्सिअस व कमाल 32.5 अंश सेल्सिअसवर आहे. मावळचा विचार करायचे झाले तर तळेगाव दाभाडे येथे किमान तापमान 10.2 अंश सेल्सिअस व कमाल 27.5 अंश सेल्सिअस (Pune Winter) आहे. लोणीकाळभोर, हवेली मधघ्येही किमान तापमान 9.7 अंश सेल्सिअस व कमाल तापमान 30.1 अंश सेल्सिअसवर आहे.

BMC : मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना इडीची नोटिस

उत्तर भारतात थंडीची लाट कायम असल्याने महाराष्ट्रातही थंडी जाणवत आहे. राज्यात 19 जानेवारी पर्यंत थंडी कायम राहील असा अंदाज वर्तवला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.