Chakan News : पालिकेचा अन्यायकारक कर रद्द करा, चाकणकर नागरिकांनी मागणी

एमपीसी न्यूज : चाकण पालिकेने केलेल्या अन्यायकारक करवाढीच्या संदर्भात चाकणकर नागरिकांनी भैरवनाथ मंदिरात बैठक घेतली. (Chakan News) पालिकेची अन्यायकारक करवाढ कमी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सर्वपक्षीयांच्या वतीने या विरोधात लढा देण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

चाकण पालिकेच्या हद्दीतील मिळकत धारकांना घरपट्टी व नळपट्टी बाबत देयके देण्यात आली आहेत. येत्या ३१ मार्च पर्यंत सदरची देयके पालिकेला भरण्याचे स्पष्ट सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.  मात्र पालिकेने दिलेल्या देयकांत यंदा प्रथमच नव्यानेच शिक्षण कर हा  लावण्यात आला आहे. हा शिक्षणकर खूप मोठ्या प्रमाणावर लावण्यात आल्याचा नागरिकांचा आरोप आहे. चाकण पूर्वी स्थापन झालेल्या राजगुरुनगर पालिकेला एवढा मोठा शिक्षण कर लावण्यात आलेला नाही. मात्र चाकण पालिकेने एवढा कर का लावला ? असा संतप्त प्रश्न नागरिक विचारात आहेत.

Chakan News : चाकण शहरात सायकल रॅली, पालिकेचा उपक्रम

चाकणकर नागरिकांच्या वतीने चाकण पालिका प्रशासनाला निवेदन देऊन मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतीच्या एकूण किमतीवर सहा टक्क्यांप्रमाणे शिक्षण कराचा मोठा बोजा पडलेला असल्याच्या तक्रारी करून हा कर रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र पालिकेने पत्र देऊन सदरचा कर रद्द करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर चाकणकर नागरिकांनी चाकण येथील भैरवनाथ मंदिरात बैठक घेऊन प्रशासनाच्या विरोधात लढा देण्याचा निर्धार केला आहे.

वाढीव शिक्षण कर रद्द न केल्यास चाकण बंदचा इशारा चाकणचे माजी उपसरपंच कालिदास वाडेकर, माजी ग्रा.पं.सदस्य अमोल घोगरे, यात्रा कमिटीचे किसन गोरे, अनिल देशमुख, (Chakan News)  धीरज परदेशी, बबन टिळेकर,  सूर्यकांत बारणे, प्रवीण करपे, लक्ष्मण वाघ, अनिल गंभीर आदींसह उपस्थित नागरिकांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.