Pune News : MPSC विद्यार्थ्यांची आज मुख्यमंत्र्यांसोबत होणारी बैठक तूर्तास रद्द

एमपीसी न्यूज : एमपीएससीचे विद्यार्थी मागण्या पूर्ण होत नसल्याने चांगलेच आक्रमक झाले आहेत. नवी परीक्षा पद्धती 2025 पासून लागू करावी. (Pune News) तसेच अभ्यास करण्यासाठी किमान 5 ते 6 महिने वेळ मिळावा.नवा अभ्यासक्रम यूपीएससीच्या अभ्यासक्रवार आधारित आहे. त्यामुळे पुस्तकं उपलब्ध नाहीत. त्यात सुधारणा करण्यात यावी या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विद्यार्थ्यांची भेट घेणार होते. मात्र ही भेट रद्द झाली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईला न जाता कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी आज दिवसभर पुण्यातच थांबणार असल्यान ही बैठक रद्द करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांसोबत सामान्य प्रशासन आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित राहणेही आवश्यक आहे. अधिकृत नोटीस काढल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी माडंली आहे.

मागील चार दिवसांपासून पुण्यात सुरु असलेल्या (Pune News) विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर यातून तोडगा निघेल अशी अपेक्षा होती. मात्र ही बैठक अचानक रद्द करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.