Central Railway : मध्य रेल्वेने दहा महिन्यात माल वाहतुकीतून कमावले 7 हजार 665 कोटी रुपये

एमपीसी न्यूज – मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 2023-24 (जानेवारी 2024 पर्यंत) 7 हजार 665 कोटी 53 लाख रुपये इतका ( Central Railway ) मालवाहतूक महसूल कमावला आहे. लोह खनिजाच्या वाहतुकीमध्ये उत्पन्न मिळवण्यात मध्य रेल्वे आघाडीवर आहे तर मागील दहा महिन्यात वार्षिक कामगिरीच्या आधारावर मध्य रेल्वे सर्व विभागामध्ये तिसर्‍या क्रमांकावर आहे.

मध्य रेल्वेने 2023-24 (जानेवारी-2024 पर्यंत) आर्थिक वर्षासाठी (एफवाय) 7 हजार 665 कोटी 53 लाख रुपयांचा आतापर्यंतचा सर्वाधिक मालवाहतूक महसूल कमावला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत 6 हजार 797 कोटी 23 लाख रुपये महसूल कमावला होता. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 12.77 टक्के अधिक महसूल कमावला आहे.

Today’s Horoscope 02 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

2023-24 मध्ये लोहखनिजाच्या वाहतुकीतून आतापर्यंतच्या सर्वाधिक 438.19 कोटी रुपयांच्या महसुलाच्या आकड्यांचा समावेश आहे. जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 64.25 टक्के अधिक आहे. हे यश नागपूर विभागातील लोहखनिजाचे प्रयत्न आणि सतत लोडिंगमुळे मिळाले आहे.

कोळसा लोडिंगमधून 3 हजार 421 कोटी 22 लाख रुपयांचा महसूल जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 10.94 टक्के जास्त आहे. लोडिंग सुधारण्यासाठी मुंबई आणि नागपूर विभागाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मिळाले आहे. लोडिंग सुधारण्यासाठी सोलापूर आणि नागपूर विभागाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सिमेंट लोडिंगमधून 616.08. कोटी रुपयांचा महसूल, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 43.54 टक्के अधिक आहे.

लोह आणि पोलाद लोडिंगमधून 555.85 कोटीचा महसूल जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 23.15 टक्के जास्त आहे आणि मुंबई विभागातून लोह आणि स्टीलच्या सतत लोडिंगमुळे अधिक आहे. जानेवारी 2024 पर्यंतच्या वर्ष-दर-वर्ष कामगिरीच्या आधारावर मध्य रेल्वे सध्या  ( Central Railway ) सर्व झोनमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.