Chakan : जमीन विक्रीत चांगला मोबदला देण्याच्या बहाण्याने 65 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ओळखीच्या (Chakan ) लोकांनी महिलेच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन जमीन विकून त्याचा चांगला मोबदला देण्याच्या बहाण्याने 65 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार फेब्रुवारी 2022 ते 6 एप्रिल 2023 या कालावधीत चाकण येथील फेडरल बँकेत घडली.

विशाल माणिक राऊत, माणिक देवराम राऊत (दोघे रा. मेदनकरवाडी, ता. खेड), एक महिला, रोलिंग फॉरवर्ड इस्टेट प्रा ली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या ओळखीचे विशाल राऊत आणि माणिक राऊत यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांची खेड तालुक्यातील रेटवडी येथे पाच एकर जमीन होती. फेब्रुवारी 2022 पासून राऊत यांनी फिर्यादी यांचा त्यांच्या जमीन विक्रीतून चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन जमीन विक्री करण्यासाठी त्यांचे चाकण येथील फेडरल बँकेत खाते उघडले.

Hinjawadi : अनोळखी लिंकवरील एक क्लिक पडला महागात; पावणे पाच लाखांची झाली फसवणूक

त्या खात्याचे एटीएम कार्ड, पासबुक आणि चेकबुक आरोपींनी स्वतःकडे ठेवले. फिर्यादी यांची जमीन जैलेन्द्र कुमार रॉय यांना विकली. त्यांच्याकडून फिर्यादी यांच्या बँक खात्यात पैसे घेण्यात आले. त्यानंतर फिर्यादी यांच्या मुलीची बनावट सही करून चेक खात्यावर जमा करून तब्बल 65 लाख रुपये एक महिला आणि रोलिंग फॉरवर्ड इस्टेट प्रा ली या कंपनीच्या खात्यावर घेऊन फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत (Chakan ) आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.