Chakan : जनावरांची क्रूरपणे वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जनावरांची क्रूरपणे वाहतूक केल्याप्रकरणी तिघांच्या(Chakan) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 11) दुपारी साडेबारा वाजता चाकण येथे घडली.

सतीश अंकुश ओझरकर (वय 32), अशोक नथू (Chakan)ओझरकर (वय 45, दोघे रा. ओझर्डे, ता. मावळ), शकील (पूर्ण नाव माहिती नाही. रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dighi : विमान तिकीट विक्रीच्या व्यवसायाच्या बहाण्याने साडेसहा लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बोलेरो पिकप गाडीत (एमएच 12/एलटी 4533) दोन बैलांची वाहतूक करताना आढळून आले. त्यांनी पिकप मध्ये बैलांसाठी चारापाण्याची सोय केली नव्हती तसेच अत्यंत क्रूरपणे बैलांना बांधून त्यांची वाहतूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.