Chakan News : जेसीबीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज – जेसीबीने दुचाकीला धडक दिली यामध्ये जेसीबीच्या लोडरचा लोखंडी दात पोटात घुसल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. (Chakan News) हा अपघात बुधवारी (दि. 16) सायंकाळी चाकण-शिक्रापूर रोडवर कडाचीवाडी येथे घडला.

अर्जुन मछिंद्र पौळ (वय 26) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराने नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण रावसाहेब मुळे (वय 36, रा. चिखली. मूळ रा. बीड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राकेश राजेंद्र पाटील (वय 20, रा. रासे, ता. खेड. मूळ रा. जळगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Mahavitaran : वीजबिल भरण्याबाबत बनावट संदेशाद्वारे आर्थिक फसवणूकीचे प्रकार; सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा अर्जुन हा बुधवारी सायंकाळी चाकण शिक्रापूर रोडने दुचाकीवरून जात होता. कडाचीवाडी येथे आल्यानंतर आरोपी जेसीबी चालकाने त्याच्या ताब्यातील जेसीबी हलगर्जीपणे चालवून दुचाकीला धडक दिली. (Chakan News) अर्जुन याच्या पोटात जेसीबीच्या लोडरचा लोखंडी दात घुसल्याने गंभीर जखमी झालेल्या अर्जुनचा जागीच मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.