Chakan : लाईट गेल्याने घर उघडे ठेवून झोपलेल्या दोन घरात मोबाईलची चोरी

एमपीसी न्यूज – पावसामुळे लाईट गेल्याने घर उघडे ठेवून झोपलेल्या दोन घरात चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी घरातून मोबाईल फोन चोरून गेले. या दोन्ही घटना रविवारी (दि. 10) पहाटे खराबवाडी, चाकण येथे घडल्या.

पहिल्या घटनेत अवि प्रेम सिंग राठोड (वय 25 रा. म्हाळुंगे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवला. राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अवि चाकण येथे एका कंपनीत नोकरी करतात. रंकाळा हॉटेल समोर म्हाळुंगे येथे ते एका भाड्याच्या खोलीत राहतात. सोमवारी मध्यरात्री लाईट गेली. त्यामुळे त्यांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा पुढे केला आणि झोपले. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचा मोबाईल फोन चोरून नेला.

दुस-या घटनेत दिनेश संजय भडकवान (वय 22, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पवन नामदेव एकसिंगे, विश्वजित बाबुराव लोंढे, शुभम ज्ञानदेव शेटे, अक्षय संदीप चव्हाण (सर्व रा. घरकुल, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. दिनेश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री त्यांच्या भागातील लाईट गेल्याने ते दरवाजा उघडा ठेवुन झोपले. रात्री चोरट्यांनी दिनेश आणि त्यांच्या मित्राचा असे एकूण १७ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन चोरून नेले. दोन्ही घटनांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.