Chakan : चाकणच्या एकतानगर परिसरात बिबट्याचे दर्शन; वन विभागाने लावले पिंजरे

एमपीसी न्यूज : चाकण शहराच्या परिसरात सध्या (Chakan) बिबट्यांनी आपले बस्तान बसवले आहे. चाकण शहरातील एकता नगर भागात बिबट्याने दर्शन दिल्याची बाब समोर आली आहे. या भागातील मोठी लोकवस्ती आणि शाळांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने या भागात दोन पिंजरे लावले आहेत.

पुणे- नाशिक महामार्गालगत असलेल्या एकता नगर भागात शनिवारी (दि. 14) भर दिवसा उसाच्या शेतात बिबट्या काही नागरिकांनी पहिला. याबाबत तातडीने वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाने येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी पिंजरे लावले आहेत. ग्लॅडिओलस इंग्लिश माध्यमाच्या शाळेच्या लगतच्या परिसरात हा बिबट्या दिसल्याने वनविभागाने विशेष खबरदारी घेतली आहे.

Pune Winter : पुण्याच्या तापमानात काही अंशी वाढ; आठ दिवसात पहिल्यांदा पारा 10 अंशाच्या वर

चाकण परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. एमआयडीसीमधील (Chakan) कंपन्यांमध्ये बिबट्या दिसून आला आहे. शहराच्या लगतच्या भागात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. खेड तालुकाच्या ग्रामीण भागाप्रमाणेच शहरांच्या परिसरात देखील मागील अनेक दिवसापासून बिबट्याची दहशत आहे. वनविभागात बिबट्याला पोटभर भक्ष मिळत नसल्याने बिबट्याचा हळूहळू लोकवस्तीकडे कल वाढला आहे. पूर्वी तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्याचा वावर असायचा, पण आता पूर्व भागात आणि शहरांच्या परिसरात देखील बिबट्याचा वावर वाढला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.