Pune Winter : पुण्याच्या तापमानात काही अंशी वाढ; आठ दिवसात पहिल्यांदा पारा 10 अंशाच्या वर

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील तापमानात आज (दि.16) काही अंशी वाढ (Pune Winter) झाली असून आज किमान तापमान हे 10.6 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान हे 31 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. मागील आठवड्यातील  सोमवार (दि.9) ते आज 16 जानेवारी या आठ दिवसात पारा हा 7 ते 9 अंश सेल्सिअसवर होता. तो आज 10 अंश पार गेला असून काही भागात 12 ते 13 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. त्यामुळे कडाक्याची वाटणारी थंडी आज गुलाबी, अल्हाददायक झाली म्हणायला हरकत नाही.

या आठ दिवसात यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात निच्चांकी तापमान नोंदवले गेले असून ते 7.4 अंश सेल्सिअस होते. या काळात पुणेकरांनी सकाळी सात व सायंकाळी सात वाजताही धुके व महाबळेश्वरच्या तोडीस तोड थंडी अनुभवली आहे. केवळ पुणेकरांनाच नाही तर चक्क मुंबईमध्येही थंडी पडली असनू पारा 13.8 अंशावर गेला आहे. मुंबईसाठी हा यंदाच्या मोसमातील सर्वांधीक कमी तापमान मानले जात आहे. येत्या दोन दिवसात मुंबईचे तापमान आणखी घसणार असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्याचा काहीसा परिणाम पुण्याच्या थंडीवर देखील होऊ (Pune Winter) शकतो.

Wakad : नोकरीचे आमिष दाखवून साडे पाच लाखांची फसवणूक करणारा अटकेत

उत्तर भारतात काश्मिर, हिमालच प्रदेश येथे बर्फवृष्टीला सुरुवात झाली असल्याने महाराष्ट्रातही पारा पुन्हा खाली घसरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे थंडीचा आनंद घ्या; पण तब्येत सांभाळून!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.