Wakad : नोकरीचे आमिष दाखवून साडे पाच लाखांची फसवणूक करणारा अटकेत

एमपीसी न्य़ूज – एका नामांकित कंपनीत डायरेक्टर (Wakad) पदावर असल्याचे सांगत तरुणाने तिघांची तब्बल साडे पाच लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फरदिन पिरोज खान (वय 23 रा. चिंचवड) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र गौरव होवाळे व विनय भदरे या तिघांना आरोपीने तो सायबेज या कंपनीच्या डायरेक्टर पदावर असल्याचे सांगितले. त्यांचा विश्वास संपादन (Wakad) करून आरोपीने त्यांच्याकडून ईमेलद्वारे एपल कंपनीचे 2 लॅपटॉप, आयपॅड, सॅमसंग कंपनीचा फोल्ड मोबाईल, 2 आयफोन, वन प्लसचा मोबाईल व रोख रक्कम 55 हजार असा एकूण 5 लाख 63 हजार 448 रुपयांचे साहित्य व पैसे घेतले.

Pimple Nilakh : स्वीकृत नगरसेवक पदावर एका ज्येष्ठ नागरिक सदस्याची निवड करावी – सचिन साठे

हा प्रकार 14 डिसेंबर 2022 पासून सुरु होता, मात्र महिना उलटून गेला तरी आरोपीने फिर्यादी व त्यांच्या मित्रांना कंपनीत नोकीरी दिली नाही. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. त्याने आणखी कोणाला फसवले आहे का? याचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.