Chikhali : जुन्या भांडणातून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणातून चार (Chikhali) जणांनी तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी (दि.14) रुपीनगर येथे घडली आहे.

याप्रकऱणी ओकांर थोपटे (वय 17 रा. रुपीनगर) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून साई शिंदे, साईचा भाऊ, अमन शेख, अथर्व गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimple Nilakh : स्वीकृत नगरसेवक पदावर एका ज्येष्ठ नागरिक सदस्याची निवड करावी – सचिन साठे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व साईचा भाऊ यांच्यात दोन दिवसांपूर्वी भांडण झाले होते. याच रागातून फिर्यादी व त्याचा मित्र क्रीश बसले असताना आरोपी पाठीमागून आले व त्यांनी फिर्यादीच्या डोक्यात पाठीमागून जोरात कशाने तरी मारले, यात फिर्यादी जखमी झाले, आरोपींनी शिवीगाळ करत फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी फिर्यादीचे मित्र भांडणे सोडविण्यासाठी आले (Chikhali) असता त्यांनाही आरोपींनी मारहाण केली. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.