Chakan : वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांची बदली; अनोखा निरोप समारंभ

एमपीसी न्यूज : चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे (Chakan ) यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. तर अशोक कदम यांची चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. वैभव शिंगारे हे अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित होते.

त्यांच्या बदली नंतर त्यांना अत्यंत अनोख्या पद्धतीने निरोप देण्यात आला. यावेळी चाकण पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अत्यंत नम्रपणे वैभव शिंगारे यांनी या निरोप समारंभाचा स्वीकार केला.

Delhi G20 : भारतात प्रथमच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे आगमन; ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि तुर्कीचे राष्ट्राध्यक्षही भारतात हजर

चाकण मधील सुमारे दोन वर्षांच्या कार्यकाळात शिंगारे यांनी थेट लोकांशी संवाद ठेवून या भागातील गुन्हेगारी ठेचण्यावर लक्ष केंद्रित केले होते. या भागातील अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कारवाया करण्यात (Chakan ) आल्या होत्या.

त्यांच्या बदलीनंतर चाकण पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचार्यांनी फुलांनी सजवलेल्या मोटारीतून चक्क त्यांची मिरवणूक काढली होती. पोलीस ठाण्यातून बाहेर पडत असताना शिंगारे यांच्यावर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.