Pune : नितेश राणे यांचे ‘ते’ वक्तव्य बालिशपणाचे आणि बुद्धी नसणारे – संजय काकडे

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील कसबा पेठ (Pune ) भागातील पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील अतिक्रमण हटविण्यात यावे. या मागणीसाठी पुण्येश्वर पुनर्निर्माण समितीच्या वतीने पुणे महापालिकेच्या बाहेर चार दिवसापूर्वी भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले.

त्या आंदोलना दरम्यान आमदार नितेश राणे आणि आमदार महेश लांडगे या दोन्ही नेत्यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याबद्दल एकेरी उल्लेख आणि वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली होती.त्या विधानाच्या निषेधार्थ पुणे महापालिकेमध्ये अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने काळ्या फिती घालून आंदोलन केले.

पुणे शहराच्या अधिकारी आणि राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.त्याच दरम्यान भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना नितेश राणे यांनी अधिकार्‍यांना वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली. तसेच कापण्याची भाषा वापरली.

त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, नितेश राणे यांनी आंदोलना दरम्यान केलेल्या विधानाचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. बालिशपणाचे आणि बुद्धी नसणारे वक्तव्य असल्याचे सांगत संजय काकडे यांनी भाजपला घरचा आहेर देत नितेश राणे यांना चांगलेच सुनावले.

Chakan : वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांची बदली; अनोखा निरोप समारंभ

तसेच ते पुढे म्हणाले की, आम्ही काही केले तरी देवेंद्र फडणवीस आमच्या पाठीशी राहतील, असा समज जर कोणाचा असेल तर तो चुकीचे आहे. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना (Pune) जवळपास 15 वर्षापासून ओळखत आहे. ते चुकीच्या कामांना थारा देत नाही.

त्यामुळे नितेश राणे यांचे विधान लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करणार आहे की, अशा विधानामुळे समाजात पक्षाची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे यापुढील काळात कोणीही अशा प्रकारची विधान करू नये,असे आदेश काढण्यात यावे, अशी मागणी करणार असल्याच त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.