Today’s Horoscope 09 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग -Today’s Horoscope 09 September 2023 
वार – शनिवार.
09.09.2023
शुभाशुभ विचार- व्यातीपात वर्ज्य.
आज विशेष- सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र- आर्द्रा 14.26 पर्यंत नंतर पुनर्वसू
चंद्र राशी – मिथुन.
——————————–
मेष ( शुभ रंग- मोतिया )
शेजाऱ्यांशी झालेले मतभेद दूर होऊन सलोखा वाढेल. घराबाहेर वावरताना क्रोधावर लगाम ठेवावा. आज आईचे मन दुखावू नका. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे.

वृषभ (शुभ रंग- राखाडी )
खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता भासणार नाही. आज संध्याकाळी काही येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. महत्त्वाच्या कामासाठी थोडी भटकंती होईल.

मिथुन (शुभ रंग- चंदेरी )
आज अति उत्साहाने तुम्ही काही चुकीचे निर्णय घ्याल. उपवारांना मनापसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. एखाद्या समारंभात तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल.

कर्क (शुभ रंग- हिरवा)
आज दिवसच खर्चाचा असल्याने बचतीचा विचारच नको. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. उंची वस्त्र खरेदी कराल. आज संध्याकाळी एखादी हरवलेली वस्तू अचानक सापडेल.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील. दिवसाच्या पूर्वार्धात लाभ संभवतो.

Pune : नितेश राणे यांचे ‘ते’ वक्तव्य बालिशपणाचे आणि बुद्धी नसणारे – संजय काकडे

कन्या ( शुभ रंग- मरून)
आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होणार आहेत. कुटुंबीयांना वेळ देणे आज जमणार नाही.

तूळ ( शुभ रंग- निळा)
आज देवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्रीच बाळगायला हरकत नाही. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल वडीलधाऱ्यांचा मान राखाल.

वृश्चिक (शुभ रंग- पिस्ता)
आज कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. हीतशत्रू कदाचित मित्रांमध्ये लपलेले असू शकतात. कोणतीही धाडसाची कामे आज नकोच. सावध राहा.

धनु (शुभ रंग- लाल) Today’s Horoscope 09 September 2023 
कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने आज तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रातही आपले महत्त्व सिद्ध करू शकाल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची खंबीर साथ राहील.

मकर ( शुभ रंग- क्रीम )
आज कोणतीही गोष्ट सहज साध्य होणार नाही. तुमची काही येणी असतील तर मात्र अनपेक्षित पणे वसूल होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की लाभेल.

कुंभ (शुभ रंग – सोनेरी)
कला व क्रीडा क्षेत्रातील मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज बरेच दिवसांनी मित्रमंडळाच्या सहवासात रमाल.

मीन (शुभ रंग – पांढरा )
आज तुम्हाला काही घरगुती प्रश्नात लक्ष घालावे लागणार आहे. मुलांच्या अभ्यासातही डोकावणे गरजेचे. काही रसिक मंडळी सहकुटुंब एखाद्या सहलीचे नियोजन करतील.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.