Weather Report : संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता

Chance of torrential rains in sparse places across the state.

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला. कोकण गोवा व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: वेंगुर्ला 11, देवगड 10, पेडणे 8, महाड 7, वैभववाडी 6, पनवेल, पोलादपूर, रत्नागिरी 5 प्रत्येकी, कुडाळ, माणगाव, माथेरान, पेण, राजापूर, सुधागड पाल्री 3 प्रत्येकी, रोहा, सावंतवाडी 2
प्रत्येकी , अंबरनाथ, कानाकोन, चिपळूण, दाभोलीम (गोवा), कणकवत्नी, खालापूर, लांजा, मालवण, मंडणगड, म्हापसा, सांगे, श्री वर्धन 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: कर्जत 10, पन्हाळा 9, खंडाळा बावडा 8, बारामती, दौंड, गडहिंग्लज, कोरेगाव 5 प्रत्येकी, भोर, कडेगाव, कराड, करमाळा, पुरंदर सासवड, वाळवा इस्लामपूर 4 प्रत्येकी, आटपाडी, इंदापूर, जामखेड, महाबळेश्वर, माळशिरस, मिरज, पाटण, पौड मुळशी, फलटण, सांगोला, शिरूर घोडनदी, श्रीगोंदा, विटा, वाई, दहीवडी माण, जावळी मेधा, कागल, कवठे महाकाळ, खटाव वडूज, कोल्हापूर, पलूस, पुणे, सातारा, सोलापूर 2 प्रत्येकी, आजारा, अक्कलकोट, बार्शी , हातकणंगले, खेड राजगुरुनगर, माधा, मंगळवेढा, सांगली, शिरोळ, तासगाव, वेल्हे 1 प्रत्येकी.

मराठवाडा: उस्मानाबाद, सेनगाव 6 प्रत्येकी, अंबेजोगाई / मोमीनबाद 4 प्रत्येकी, कैज, लातूर, मंठा, सोनपेठ, उमरगा 3 प्रत्येकी, औढा नागनाथ, लोहारा, मंजलगाव, निलंगा, पाटोदा 2 प्रत्येकी, अंबड, आष्टी, औरंगाबाद एपी, देवणी, धारूर, हदगाव, हिमायतनगर , हिंगोली, जिंतूर, मानवत, परंडा, परभणी, परतूर, पाथरी, पूर्णा, रेणापूर, शिरूर अनंतपाल, शिरूर कासार 1 प्रत्येकी.

विदर्भ: जिवती, खरंगा, सिरोंचा 3 प्रत्येकी, अहिरी, आर्वी, कोरपना, कुरखेडा, उमर खेड, वाशिम 2 प्रत्येकी, अर्जुनी मोरगाव, एटापल्ली, गोंड पिपरी, कोरची, मोहाडी, मुल चेरा, राजुरा, रिसोड, साकोली 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

12 ऑक्टोबर: विदर्भात बहुतांश ठिकाणी, कोंकण गोवा व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

13 ऑक्टोबर: मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

14 ऑक्टोबर: कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

15 ऑक्टोबर: कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा:

12 ऑक्टोबर: गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता . गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

13 ऑक्टोबर: मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोंकण – गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता . दक्षिण महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

14 ऑक्टोबर: कोंकण – गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता . गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनजा व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता . महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

15 ऑक्टोबर: कोंकण – गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता . गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.