Chandkhed Crime News : चांदखेड येथील उरुसामध्ये गोळीबार  करणाऱ्यांना अटक

एमपीसी न्यूज –चांदखेड येथील उरुसामध्ये गोळीबार  करणाऱ्या टोळीतील 4 जणांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस (Chandkhed Crime News)अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अविनाश गोठे (रा. चांदखेड) हा यातील मुख्य आरोपी असून त्याला अटक करण्यात आली आहे. अमर शिंदे, मनिषकुमार यादव व विजय खंडागळे या त्याच्या तीन साथीदारांना देखील अटक करण्यात आली आहे.काल संध्याकाळी गोळीबार झाल्यानंतर शिरगांव पोलीस ठाण्याचे पथक तेथे लगेच पोहोचले होते.

Pimpri News: उल्लेखनीय कार्य करून देखील भगिनी निवेदीतावर धर्म मार्तंडांनी टीका केली – प्रा जोशी 

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल मंगळवार 10 जानेवारी रोजी चांदखेड गावाचा उरूस होता. संध्याकाळी 5 जणांच्या टोळक्याने तमाशाच्या मंडपामधील पेट्यांवर कोयत्याने वार केले. त्यानंतर त्यांनी चौकात जाऊन हवेत गोळीबार केला. या टोळीमध्ये एक अल्पवयीन (Chandkhed Crime News)मुलगा सुद्धा होता. गोळीबार का करण्यात आला व इतर माहिती मिळवण्यासाठी पोलीस तपास चालू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.