Pimpri News: उल्लेखनीय कार्य करून देखील भगिनी निवेदीतावर धर्म मार्तंडांनी टीका केली – प्रा जोशी 

एमपीसी न्यूज –आपल्या देशाच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबल म्हणजेच भगिनी निवेदिता यांच्या कार्याचे स्मरण होणे गरजेचे आहे. त्यांनी भारतीय समाज जीवनात सर्व क्षेत्रात कार्य करून आपल्या कार्याचा ठसा उमटवला.तरी देखील आपल्या देशातील धर्म मार्तंडांनी टीका करीत तोंडसुख (Pimpri News) घेतले. असे प्रतिपादन मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी केले.

शरद नगर चिखली येथे स्वामी विवेकानंद यांच्या 160 व्या जयंतीनिमित्त, स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने तीन दिवसीय व्याख्यानमालेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी “स्वामीजींच्या शिष्या भगिनी निवेदिता” यांच्याविषयावर त्यांनी पहिले पुष्प गुंफले.यावेळी साई हायस्कूलचे संचालक शिवलिंग ढवळेश्वर, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर नागरगोजे, निलेश नेवाळे,राजेंद्र घावटे, देवराम मेदनकर , प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराजे बेंबडे आदी उपस्थित होते.

Pimpri News : सत्ता टिकवण्यासाठी गुजरातच्या वीज कंपनीपुढे भाजपचे लोटांगण – अजित गव्हाणे

प्रा जोशी पुढे म्हणाले की,  स्वामी विवेकानंद अमेरिकेत सर्वधर्मपरिषदेत बोलताना म्हणाले की,  “भारतीय स्त्रिया बुद्धिवान आहे. मात्र त्यांना चाली- रूढी परंपरेच्या जोखडातून मुक्त करण्याची आवश्यकता आहे. या विवेकानंदांच्या विचाराने प्रेरित होऊन मार्गारेट नोबल यांनी भारतातील स्त्रियांसाठी कार्य करण्याचा हट्ट विवेकानंदांकडे धरला व शेवटी त्यांच्या 36 सहकारी महिलांसोबत त्या भारतात आल्या. आपल्या (Pimpri News) देशात येवून त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आणि  त्यांचे भगिनी निवेदिता नामकरण झाले.त्यांनी लोकमानस व लोककला समजून घेतली. भगिनी निवेदिता यांनी “काली द मदर” या विषयावर कोलकता येथे व्याख्यान दिले.त्यांनी रवींद्रनाथ टागोर व बोस यांच्या काही पुस्तकांचे अनुवाद केले.

प्लेगच्या साथीमध्ये आलेल्या गोऱ्या गोमट्या उच्च विद्याविभूषित महिलांनी भारतीयांची स्वच्छतेच्या माध्यमातून सेवा केली.त्यांनी मुलींसाठी शाळा, कुमारी माता व विधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्य केले. त्यावेळी भारतातील धर्ममार्तंडांनी त्यांच्यावर टीका करीत तोंडसुख घेतले.भगिनी निवेदिता  चाफेकर बंधूंच्या मातोश्रींचे सांत्वन करण्यासाठी पुण्यात आल्या होत्या .यावरून त्यांचे पुण्याशी असलेले नाते समजते, असे जोशींनी सांगितले.

Pune News : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन

 प्रास्ताविक रामराजे बेंबडे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष ठाकूर तर आभार मिलिंद वेल्हाळ यांनी मानले.कार्यक्रम आयोजनासाठी सुनील पंडित, (Pimpri News)महेश मांडवकर, संतोष ठाकुर, शंकरराव बनकर, पंढरीनाथ म्हस्के, सुनील खंडाळकर, दिलीप मांडवकर, अशोक हड़के, सिद्धराम मालगत्ती यांनी पुढाकार घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.