Pune News : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज :  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह 2023 चे उद्घाटन करण्यात आले. (Pune New) यावेळी मोटारसायकल फेरीचा शुभारंभही करण्यात आला. 11 ते 17 जानेवारी या कालावधीत हा सप्ताह राबवण्यात येत आहे.

यावेळी पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले, अमर देसाई व युवराज पाटील उपस्थित होते.

Pimpri News : वेळेत मिळकतकर बील न देणाऱ्या करसंकलन विभागाच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करा – मारूती भापकर

डॉ. देशमुख म्हणाले, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केवळ सप्ताहापुरते मर्यादित न ठेवता वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे. (Pune News) सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्राचा शोध घेऊन त्याची दुरुस्ती करावी. देशात मोठ्या प्रमाणात रस्ते विकासाची कामे सुरू असताना अपघातांचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे नागरिकानी प्रवास करताना सीटबेल्ट व हेल्मेटचा वापर करण्यासह वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले.

मोटरसायकल फेरीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरु होऊन पुढे कॅम्प, पुलगेट, स्वारगेट, सारसबाग, टिळक रोड, लकडी पुल, फर्ग्युसन महाविद्यालय रोड, कृषी महाविद्यालय, संचेती हॉस्पिटल मार्गे परिवहन कार्यालय येथे या फेरीचा समारोप करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.