Moshi News: ‘कन्स्ट्रो 2023 इंटरनॅशनल एक्सपो’ प्रदर्शन

एमपीसी न्यूज – पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशन (पीसीइ आरएफ), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या  संयुक्त  विद्यमाने निर्माण क्षेत्रातील ‘कन्स्ट्रो 2023 इंटरनॅशनल एक्सपो’ या भव्य प्रदर्शनाचे 12 ते 15 जानेवारी 2023 या कालावधीत मोशी येथील ( Moshi News )’अद्ययावत पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन’ या ठिकाणी आयोजन  करण्यात आले आहे.

Pimpri News : वेळेत मिळकतकर बील न देणाऱ्या करसंकलन विभागाच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करा – मारूती भापकर

या प्रदर्शनात निर्माण क्षेत्रातील अत्याधुनिक वस्तू , उपकरणे , प्रणाली, व तंत्रज्ञान यांची माहिती मिळणार आहे.  त्यामुळे निर्माण क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी  ही मोठी पर्वणी आहे. या प्रदर्शनास राज्यातील  निर्माण क्षेत्रात कार्यरत असणारे विविध व्यावसायिक भेट देणार आहेत. तसेच वास्तू रचना व स्थापत्य शास्त्रचे विद्यार्थीही ( Moshi News )  याठिकाणी  भेट देणार आहेत.

या प्रदर्शनाच्या निमित्ताने निर्माण क्षेत्राशी निगडित विविध विषयांवर सर्व दिवस चर्चा सत्र आयोजित केलेली आहे. ज्या मध्ये विविध विषयातील तज्ञ विचार मांडणार आहेत. प्रदर्शनात तंत्रज्ञानाचे तसेच सुरक्षेविषयक प्रात्यक्षिक देण्याचीही   व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 12 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे.

Pimpri News : ‘हेवन जिम्नॅस्टीक’ अकादमीची 2023 ची सुरुवात दणक्यात

याप्रसंगी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष निमेश पटेल व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त  राहुल महिवाल तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह  यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. जास्तीत-जास्त वास्तुविशारद, विकसक, बिल्डर्स, कंत्राटदार, इंटेरिअर डिझायनर, अभियंते, उत्पादक व पुरवठादार यांनी या प्रदर्शनाला उपस्थित राहावे, असे आवाहन ( Moshi News )करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.