Pimpri News : ‘हेवन जिम्नॅस्टीक’ अकादमीची 2023 ची सुरुवात दणक्यात

एमपीसी न्यूज – शिर्डी येथील संजीवनी इंटरनॅशनल स्कूल ने सीबीएसइ अधिकृत शाळांच्या स्पोर्टस ऐरोबिक्सच्या राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन  केले होते. पिंपरी चिंचवड मधून हेवन जिम्नॅस्टीक अकादमीच्या 4 खेळाडूंनी यात सहभाग घेऊन  एकूण दोन सुवर्णपदक व एक रजत (Pimpri News) पदक प्राप्त केले आहे.

 

11 वर्षातील गटात -वैयक्तिक महिला गट-सृष्टी खोडके सुवर्णपदक (ऐल्प्रो इंटरनेश्नल स्कूल,चिंचवड),अंतरा कळमकर चौथे स्थान (सिटी प्राईड स्कूल,निगडी,प्राधिकरण),19 वर्षातील गट-वैयक्तिक महिला गट – वृंदा सुतार- सुवर्णपदक (ब्लोसम पब्लिक स्कूल,वाकड.) परीजा क्षीरसागर- रजत पदक(सिटी प्राईड स्कूल,निगडी,प्राधिकरण) या खेळाडूंनी स्पर्धेत यश मिळविले.

Pune News : ‘मिलाप करंडक 2023’ पुरस्कार नगीनदास खंडवाल व मामासाहेब मोहोळ महाविद्यालयांनी पटकावला

खेळाडूंनी मिळविलेल्या उत्तम यशाबद्दल अकादमीचे प्रमुख प्रशिक्षक अलका तापकीर,चैतन्य कुलकर्णी,मार्गदर्शक नगरसेवक विनोद तापकीर,सर्व शाळांच्या मुख्यध्यापकांनी खेळाडूंचे व हेवन जिम्नॅस्टीक अकादमीचे तसेच पालकांचे खूप कौतुक केले.संघाचे व्यवस्थापन  सौ.स्वप्ना कळमकर यांनी केले तर प्रशिक्षक (Pimpri News) म्हणून हर्षद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.